सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराची १३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराची १३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
“

सुसज्ज अभ्यासिकेसह नवीन इमारतीचे काम वर्षभरात पूर्ण करणार : अध्यक्ष डॉ. वामन सामंत

विशेष प्रतिनिधी

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या येथील ऐतिहासिक श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराची १३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ४.५० कोटी रुपयांच्या निधीतून ग्रंथालयाची भव्य वास्तू शहराच्या मध्यवर्ती भागात उभारत असून, सुसज्ज अभ्यासिकेसह या नवीन इमारतीचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा निर्धार संस्थेचे अध्यक्ष डॉ. वामन सामंत यांनी व्यक्त केला.

​सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सामंत यांनी संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला. वाचनालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत ५२ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाली असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. तसेच ग्रंथालयाने १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बालविभागाचे मोफत सभासदत्व देण्याची अभिनव योजना सुरू केली असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

​याप्रसंगी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले अभ्यासक रोहित शेवाळे (पोळगाव), मनोज नार्वेकर (पोळगाव), अतिश बागवे (बुरूडे), संध्या पाटील (होनेवाडी), स्नेहल पाटील (मुरूडे), साहिल तेजम (विटे), प्राजक्ता कांबळे (बुरूडे), सुहास कोंडुसकर (सोहाळे), तानाजी कांबळे (देवर्डे), शुभांगी चौगुले (मेंढोली) आणि रेश्मा शिंदे (वेळवट्टी) यांचा शाल, सन्मानचिन्ह व ग्रंथ देऊन विशेष गौरव करण्यात आला.

​ग्रंथालयाचे संचालक व माजी सहकार्यवाह विनायक मल्लाप्पा आमणगी यांनी स्वतःच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचा अनावश्यक खर्च टाळून ग्रंथालयाच्या जागेत बोअरवेल व मोटरपंप जोडणीसाठी १ लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली. त्यांच्या या सामाजिक दातृत्वाबद्दल सभेमध्ये त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

​सत्कारानंतर विनायक आमणगी, टीईटी परीक्षेतून शिक्षकपदी निवड झालेल्या रेश्मा शिंदे आणि संचालक सुभाष विभुते यांनी मनोगत व्यक्त केले.

​सभेच्या सुरुवातीला दिवंगत मान्यवरांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यकारिणी सदस्या सुचेता गड्डी यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी विषयपत्रिका, मागील सभेचे इतिवृत्त व आर्थिक पत्रकांचे वाचन केले; त्यास सभेने एकमुखाने मंजुरी दिली.

​या सभेस लेखापरीक्षक प्रकाशराव देसाई, मारुतीराव मोरे, अनंत आजरेकर, शिवाजीराव पाटील, शिवाजीराव इंजल, आप्पा पावले, आय. के. गिलबले, शितल हरेर, शुभांगी निर्मळे, सुरेखा भालेराव, नुरजहाँ सोलापूरे, सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी, विजय राजोपाध्ये, सदाशिव मोरे, डॉ. अशोक बाचुळकर, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, गिता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ संचालक संभाजीराव इंजल यांनी केले, तर उपाध्यक्षा विद्या हरेर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान
शैक्षणिक

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान

आजरा साखर कारखान्याची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
महाराष्ट्र

आजरा साखर कारखान्याची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

व्यंकटराव शिक्षण संकुलात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

ANCHOR AD SLOT