सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

आजरा महाविद्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यात स्वच्छता मोहीम; विद्यार्थ्यांना पोलीस भरती व दक्षता पथकाबाबत मार्गदर्शन

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

आजरा महाविद्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यात स्वच्छता मोहीम; विद्यार्थ्यांना पोलीस भरती व दक्षता पथकाबाबत मार्गदर्शन
“

संवाद सत्रात पोलीस अधिकारी बाबासाहेब सरवदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील शिस्त, कायद्याचे पालन आणि समाजात सुव्यवस्था राखण्यासाठी तरुणाईचे योगदान याविषयी त्यांनी मोलाचे विचार मांडले.

आजरा: गोपाळ गडकरी,

आजरा महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत आजरा पोलीस ठाण्याच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयातील ५५ विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. श्रमदानातून विद्यार्थ्यांनी संपूर्ण पोलीस ठाणे परिसर स्वच्छ केला.

​स्वच्छता मोहिमेनंतर पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना चहा-नाश्ता देण्यात आला. यानंतर आयोजित संवाद सत्रात पोलीस अधिकारी बाबासाहेब सरवदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील शिस्त, कायद्याचे पालन आणि समाजात सुव्यवस्था राखण्यासाठी तरुणाईचे योगदान याविषयी त्यांनी मोलाचे विचार मांडले.

​याप्रसंगी हर्षाली मॅडम यांनी दक्षता पथकाचे कामकाज, नागरिकांची सुरक्षा आणि महिला सुरक्षेशी संबंधित कायद्यांची माहिती दिली. कोणत्याही गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी दक्षता पथक कसे काम करते, हे त्यांनी स्पष्ट केले. तर राहुल पन्हाळकर यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शारीरिक व लेखी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन आणि करिअरच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

​महाविद्यालयाने राबवलेल्या या उपक्रमाचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले असून, या संवादामुळे विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाची जवळून माहिती मिळाली.

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान
शैक्षणिक

अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा शैक्षणिक संकुलात भव्य स्वच्छता अभियान

आदर्श हायस्कूल शिरसंगी येथे ‘वन ज्ञान स्पर्धा’ उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

आदर्श हायस्कूल शिरसंगी येथे ‘वन ज्ञान स्पर्धा’ उत्साहात संपन्न

ब्रेकिंग न्यूज: गणेशोत्सवापाठोपाठ आजरा शहरातील नवरात्रोत्सवही होणार डॉल्बीमुक्त!
देश

ब्रेकिंग न्यूज: गणेशोत्सवापाठोपाठ आजरा शहरातील नवरात्रोत्सवही होणार डॉल्बीमुक्त!

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराची १३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराची १३७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

ANCHOR AD SLOT