सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

भाजप कोल्हापूर (ग्रामीण) सोशल मीडिया सेलच्या सह संयोजकपदी हर्षद परुळेकर (आजरा) यांची निवड

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

भाजप कोल्हापूर (ग्रामीण) सोशल मीडिया सेलच्या सह संयोजकपदी हर्षद परुळेकर (आजरा) यांची निवड

आजरा: गोपाळ गडकरी,

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर (ग्रामीण) जिल्हा सोशल मीडिया सेलच्या सह संयोजकपदी आजरा येथील निष्ठावंत कार्यकर्ते श्री. हर्षद परुळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परुळेकर यांचा आजवरच्या संघटनेच्या कामाचा अनुभव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल आजरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

​आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हर्षद परुळेकर म्हणाले की, "माझ्या प्रामाणिक कष्टांना पक्षाने दिलेली ही पावती असून, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर दाखवलेला हा मोठा विश्वास आहे. ही केवळ एक पदोन्नती नसून पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याची जबाबदारी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे आणि विकासकामे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन."

​या नियुक्तीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली तसेच कोल्हापूर (ग्रामीण) जिल्हा भाजपचे खंबीर अध्यक्ष नाथाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला.

​तसेच, विश्वासाने ही जबाबदारी दिल्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ), आयुष्मान भारत समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे, आजरा शहराचे माजी सरपंच अरुण देसाई, ज्येष्ठ मार्गदर्शक मलिक कुमार बुरुड, प्रा. सुधीर मुंज, श्रीनाथ देसाई, आनंदा कुंभार, दयानंद भुसारी यांच्यासह पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

​हर्षद परुळेकर यांच्या नियुक्तीमुळे आजरा परिसर आणि कोल्हापूर ग्रामीण भागातील भाजप सोशल मीडिया सेल अधिक सक्रिय व प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

आजरा महाविद्यालयात ‘नॅक रीफॉर्म- २०२४’ विषयावर कार्यशाळा संपन्न
देश

आजरा महाविद्यालयात ‘नॅक रीफॉर्म- २०२४’ विषयावर कार्यशाळा संपन्न

सांप्रदाय भारती श्री कृष्णकांत स्वामी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात; श्रीक्षेत्र शेळप येथे संपन्न झाला सत्कार सोहळा
महाराष्ट्र

सांप्रदाय भारती श्री कृष्णकांत स्वामी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात; श्रीक्षेत्र शेळप येथे संपन्न झाला सत्कार सोहळा

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात; स्वच्छताविषयक पथनाट्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात; स्वच्छताविषयक पथनाट्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा महाविद्यालयात अण्णा भाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न*
महाराष्ट्र

आजरा महाविद्यालयात अण्णा भाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न*

ANCHOR AD SLOT