सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

एरंडोळ हायस्कूलमध्ये ‘भोंडला’ उत्साहात साजरा; राष्ट्रीय व राज्यस्तरीय गुणवंत खेळाडूंचा गौरव

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

एरंडोळ हायस्कूलमध्ये ‘भोंडला’ उत्साहात साजरा; राष्ट्रीय व राज्यस्तरीय गुणवंत खेळाडूंचा गौरव

एरंडोळ (विशेष प्रतिनिधी): गोपाळ गडकरी

एरंडोळ हायस्कूल, एरंडोळ येथे भारतीय संस्कृती व लोकपरंपरांचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘भोंडला’ (हादगा) महोत्सवाची सांगता शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साही वातावरणात झाली. मंगळवारपासून सुरू असलेल्या या पारंपरिक उत्सवात विद्यार्थिनींनी फेर धरत हस्त नक्षत्राच्या काळात गायली जाणारी भोंडल्याची पारंपरिक गाणी सादर करून संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले.

​कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. हेमलता कामत आणि सौ. शामल बारदेसकर यांच्या हस्ते भोंडल्याच्या विधिवत पूजनाने झाली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, भोंडला हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून त्यातून निसर्गाशी नातं जोडणारे आणि जीवनाचे सार सांगणारे अनेक मोलाचे संदेश मिळतात. नव्या पिढीने आपली ही समृद्ध संस्कृती जोपासणे व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे काळाची गरज आहे.

​यशस्वी खेळाडू विद्यार्थिनींचा विशेष सत्कार


याच कार्यक्रमाच्या औचित्याने विविध राष्ट्रीय, राज्य आणि विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत खेळाडू विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला:

​समीक्षा पाटील: राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा मान्यवर श्री. घुमकर सर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

​वैभवी तेजम:

​मथुरा (उत्तर प्रदेश) येथे ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक.

​रयत शिक्षण संस्थेमार्फत आयोजित आंतरविभागीय रोप मल्लखांब स्पर्धेतही पटकावला प्रथम क्रमांक.

या दुहेरी यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ. हेमलता कामत यांच्या हस्ते करण्यात आला.

​विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी समाधान व्यक्त करत सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
देश

रोझरी इंग्लिश स्कूल, आजरा येथे हिरक महोत्सवाचा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न

आदर्श हायस्कूल शिरसंगी येथे ‘वन ज्ञान स्पर्धा’ उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

आदर्श हायस्कूल शिरसंगी येथे ‘वन ज्ञान स्पर्धा’ उत्साहात संपन्न

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

रोझरी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

आजरा महाविद्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यात स्वच्छता मोहीम; विद्यार्थ्यांना पोलीस भरती व दक्षता पथकाबाबत मार्गदर्शन
महाराष्ट्र

आजरा महाविद्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यात स्वच्छता मोहीम; विद्यार्थ्यांना पोलीस भरती व दक्षता पथकाबाबत मार्गदर्शन

ANCHOR AD SLOT