सारथी महाराष्ट्राचा
newspaper ई-पेपर
search

तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आजरा हायस्कूलचा डंका; १४ व १७ वर्षे वयोगटात मिळवले घवघवीत यश

Admin Sarthi Maharashtracha

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आजरा हायस्कूलचा डंका; १४ व १७ वर्षे वयोगटात मिळवले घवघवीत यश

आजरा (प्रतिनिधी): गोपाळ गडकरी,

येथे उत्साहात पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या खेळाडूंनी चौफेर यश मिळवून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. १४ वर्षे आणि १७ वर्षे अशा दोन्ही वयोगटांतील मुले व मुलींच्या विविध स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली. या यशाच्या जोरावर अनेक खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

​स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेला निकाल खालीलप्रमाणे:

​१७ वर्षे वयोगट निकाल:

​१०० मीटर धावणे (मुले): महम्मद आय्याज यासीन माणगावकर (प्रथम क्रमांक)

​२०० मीटर धावणे (मुले): अनंत संतोष गिरी (प्रथम क्रमांक)

​मुलींचे वैयक्तिक यश: दीपा रामचंद्र गावडे हिने २०० मीटर धावणे, लांब उडी तसेच उंच उडी या तिन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.

​४×१०० मीटर रिले (मुले - प्रथम क्रमांक): महम्मद आय्याज माणगावकर, अनंत गिरी, सिद्धिक वाडीकर, जीवन कांबळे आणि प्रज्वल लाड.

​४×१०० मीटर रिले (मुली - प्रथम क्रमांक): दीपा गावडे, साक्षी गावडे, श्रेया पाचवडेकर, श्रेया पाटील आणि श्रद्धा सलामवाडे.

​४×४०० मीटर रिले: मुले व मुली अशा दोन्ही संघांनी चुरशीच्या लढतीत द्वितीय क्रमांक पटकावला.

​१४ वर्षे वयोगट निकाल:

​१०० मीटर धावणे: नियंत अजित पोवार (मुले - प्रथम क्रमांक), अन्वी राहुल नेवरेकर (मुली - प्रथम क्रमांक), उत्कर्ष उमेश जाधव (मुले - तृतीय क्रमांक).

​२०० मीटर धावणे: उत्कर्षा अनिल निर्मळे (मुली - प्रथम क्रमांक), महंमद रहिमतुल्ला बुड्डेखान (मुले - द्वितीय क्रमांक).

​थाळीफेक (मुले): उत्कर्ष उमेश जाधव (तृतीय क्रमांक).

​४×१०० मीटर रिले (मुले - प्रथम क्रमांक): उत्कर्ष जाधव, महंमद रहिमतुल्ला बुड्डेखान, आरुष कुंभार, नियंत पोवार आणि ऋतुराज गिरीगोसावी.

​४×१०० मीटर रिले (मुली - प्रथम क्रमांक): उत्कर्षा निर्मळे, मुंतहा सय्यद, श्रावणी इलगे, अन्वी नेवरेकर आणि अफिफा नेसरीकर.

​या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री. एम. एस. गोरे, सौ. एम. व्ही. पाटील व श्री. ए. एस. नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

​शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचे जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री. अशोक अण्णा चराटी, संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी, पर्यवेक्षक श्री. एम. एस. गोरे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Admin Sarthi Maharashtracha

Admin Sarthi Maharashtracha

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

भाजप कोल्हापूर (ग्रामीण) सोशल मीडिया सेलच्या सह संयोजकपदी हर्षद परुळेकर (आजरा) यांची निवड
महाराष्ट्र

भाजप कोल्हापूर (ग्रामीण) सोशल मीडिया सेलच्या सह संयोजकपदी हर्षद परुळेकर (आजरा) यांची निवड

कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आजरा पोलीस ठाणे गणेशोत्सव पुरस्कार सोहळा उत्साहात
महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आजरा पोलीस ठाणे गणेशोत्सव पुरस्कार सोहळा उत्साहात

आजरा साखर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव सरोळकर तर व्हा. चेअरमनपदी सौ. रजनी जाधव यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र

आजरा साखर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव सरोळकर तर व्हा. चेअरमनपदी सौ. रजनी जाधव यांची बिनविरोध निवड

नटसम्राट हरपला; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन
महाराष्ट्र

नटसम्राट हरपला; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

ANCHOR AD SLOT